गुरुवार, ६ सप्टेंबर, २०१२

Ratna Vishwa -Part 2 

 

ऱ्होडोनाइट

 


 

         ऱ्होडोनाइट  हे नाव ग्रीक नाव असून त्याच्या गुलाबी-लाल रंगा वरून पडले आहे, सामान्यपणे ऱ्होडोनाइट हा गुलाबी-लाल रंगाचा आसतो परंतु कधी कधी हे रत्न विटकरी-तपकिरी रंगात हि सापडते, ह्या रत्ना मध्ये थोड्या प्रमाणावर manganese oxide असल्या कारणाने काही ठिकाणी काळे डाग किवा काळ्या रंगाच्या रेषा, छटा दिसून  येतात.
               इतर गुलाबी रंगाच्या रत्ना प्रमाणे हे सुद्धा प्रेमाची उर्जा प्रवाहित करते आणि याचे वैशिष्ठ्य म्हणजे हा प्रेमाचा वर्षाव बाहेरील बाजूस होत असल्या कारणाने भावनिक समतोल साधून माणुसकी वाढवण्यास मदत करते. हे रत्न व्यक्ती व परिस्थिती या दोन्हींना आकर्षित करून अंगी असणाऱ्या असाधारण किंवा
वैशिष्ठ्यपूर्ण गुणाचा उपयोग करण्यास मदत करते. हे रत्न हृदय चक्राशी संमंधित असल्या कारणाने प्रेमाची परीपूर्णता होण्यास तसेच कोणावर प्रेम करण्यास व प्रेम मिळवण्यास प्रेरक ठरते.
           ह्या रत्नाला प्रथमोपचार रत्न हि म्हणतात कारण हे रत्न कोणताही भावनिक आघात सहन करून सवरक्षात्मक उर्जा आत्म्याला देण्याचे काम करते व कोणत्याही प्रकारच्या  आत्मघातकी विचारांपासून दूर राहण्यास मदत करते, ह्या साठी ज्यांचा प्रेमभंग झाल्यामुळे जगण्यासारखे काही नाही असे वाटते आहे, किवा एखादा मानसिक धक्का बसल्याने आत्म हत्तेचे विचार मनात घोळत आहे, किवा आत्म हत्तेचा प्रयत्न केलेला आहे  किवा ज्यांचा सर्वांवरच राग आहे, अशा सर्वान साठी भावनिक अविचाराना दूर सारून प्राप्त परिस्थितीवर मात  करीत,  सर्वाना क्षमा करत आनंदाने जगण्यास मदत करते. तसेच हे रत्न आपण कोणावर आवलंबुन आहोत, आपली कोणाला गरज नाही, आपल्याकडे सर्वांचे दुर्लक्ष होत आहे, अशा भावनिक जखमांचा उद्रेक होऊ न देता बऱ्या करण्यास किवा त्याचे चीड-चिडी मध्ये रुपांतर होण्यापासून थांबवण्यास मदत करते. तसेच भूतकाळातील वाइट आठवणीच्या  जखमानावर खपली धरून, नको असलेला भूतकाळ विसरण्यास मदत करते. राग, द्वेष, तिरस्कार, सूड ह्या भावना स्वत:लाच  नष्ट करणाऱ्या प्रवृत्ती आहेत ह्याची ह्या रत्नाच्या वापरणे जाणीव होऊन क्षमा व दया भाव वाढीस लागतो. तसेच अपमान, तिरस्कार ह्या सारख्या भावना मनामध्ये निर्माण होऊ न देता उद्दिष्टावर लक्ष केंद्रित ठेऊन ध्येयपथावर राहण्यास प्रोत्साहित करते.
             शारीरिक पातळीवर हे रत्न मास पेशी  व हाडांना ताकद देण्याचे काम करते, तसेच यकृतातील विषद्रव्य बाहेर टाकण्यास मदत करून शरीराची चेतना व उर्जा शक्ती वाढवते. पित्ताशयातील खडे, किवा मुतखडा आदींवर मात करण्या साठी ह्या रत्नाचा उपयोग होतो. मास पेशीतील व संद्यातील दाह कमी करून आजार बरे होण्यास मदत करतो, हे रत्न मना बरोबरच शरीर सुद्धा शुद्ध करीत असल्याने, विशेषतः  शरीरात साठलेले अनावश्यक द्रव्य बाहेर टाकण्यास मदत करीत असल्याने काहे अंशी वजन कमी करण्यास उपयोगी पडते.
               ज्योतिष शास्त्रा नुसार रवी, मंगल, बिघडलेले असल्यास, रवी ३,६,७,८,१२ स्थानी असून अशुभ ग्रहांनी युक्त किवा अशुभ दृष्टीत असेल त्यांनी हे रत्न जरूर वापरावे. षष्ट स्थानात शनी असता अथवा
षष्ट स्थानावर शनीची दृष्टी असता अपचन, पोटाचे आजार, तसेच सांधेदुखी होण्याची शक्यता असते अशा वेळेस  ऱ्होडोनाइट हे रत्न वापरणे फायदेशीर ठरते.
डॉ. अभय अगस्ते

सोमवार, ६ ऑगस्ट, २०१२

Ratna Vishwa

रत्नविश्व 

माझ्या रत्नविश्व ह्या आगामी पुस्तकातील काही भाग   

 

मूनस्टोन

           हे चंद्रग्रहाचे रत्न असून मोती रत्नाल पर्याय म्हणून या रत्नाचा विचार  होतो. हे मोती  रत्नाचे उपरत्न म्हणून  जरी  प्रचलित असले तरी सुद्धा याचे  स्वतःचे असे वेगळे गुणधर्म आहेत. पांढरट धुरसर चमक असलेले, मधूनच निळसर छटा दिसणारे हे रत्न सुखी व समृद्ध वैवाहिक जीवनासाठी वधु-वरास भेट देण्याची प्रथा अनेक ठिकाणी दिसून येते. काही लोकांची अशी धारणा आहे कि हे रत्न पौर्णिमेच्या रात्री तोंडात धरल्यास भविष्यात घडणाऱ्या घटना समजतात. हे रत्न चांदाशी सामंधित असल्याने मनाची एकाग्रता साधून अंतरञान होण्यास मदत करते. ज्या प्रमाणे चंदाच्या स्थिती मध्ये रोज बदल होत असतो  त्या प्रमाणे जीवनात येणाऱ्या स्थित्यंतरास शांत संयमित राहून सामोरे जाण्यास मदत करते.
          हे रत्न धारण करणाऱ्यास शारीरिक दृष्ट्या शांत ठेवते, कोणत्याही परिस्थितीत संयम ढळू देत नाही व अतिरेकी प्रतीशिप्त क्रियांवर नियंत्रण ठेवते. हे  रत्न  अंगच्या गुणांना वाव निर्माण करून देण्यास मदत करीत असल्याने जे स्वताचे विचार, अंगी असणारे गुण प्रगट करू शकत नसतील, किवा स्वताच्या अंगी असलेल्या गुणांची जाणीवच नसेल अशांसाठी अंगचे गुण प्रगट करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. भावनिक समतोल ठेऊन मनाला काबूत ठेवण्यास मदत करते तर संतुलित विचाराने घेतलेल्या निर्णयावर अंमल करण्यास भाग पाडते.
       मनाशी सामंधित असणारया चंद्र ग्रहाचे हे रत्न असल्याने ह्या अंमल मनावरती विशेतः दिसून येतो, बिघडलेल्या मानसिक स्थितीत नाकारात्मता दूर करण्यास मदत करून मानसिक स्थिती सचेतन, आनंदी  ठेवण्यास मदत करतो म्हणून या रत्नाला  "सकारात्मक सवरक्षक" हि म्हणतात. ज्या व्यक्तींना रोजच्या कामामध्ये जास्त मानसिक, शारीरिक ताण पडतो अशांसाठी तसेच ज्या व्यक्ती जुनी भावनिक सल, अपधीपणा मनामध्ये घेऊन वावरत असतात अशा भावनिक जखमावर मात करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. तसेच ज्यांना पाण्याची भीती वाटते त्यांची भीती दूर करून सुरक्षितता देते, म्हणून जल प्रवासात व जलक्रीडेत हे रत्न वापरण्याची प्रथा आहे.
      मूनस्टोन हे मनाला संयमित व शांत करीत असल्याने संतापी, चीड-चिड्या व्यक्ती साठी तर हट्टी व त्रास देणाऱ्या मुलांसाठी उपयोगाचे आहे. ह्या रत्नाच्या वापराने शांत झोप लागते, त्यामुळे निद्रानाशाचा आजार असणार्यांनी जरूर वापरावे. ज्यांना झोपेत चालण्याची वाईट सवय असते अशी सवय मोडण्यास मदत करते. स्त्रियांमध्ये स्त्री तत्वाची जाणीव करून देऊन मासिक चक्र नियमित ठेवण्यास मदत करीत असल्याने मासिकपाळीच्या तक्रारी असणार्या स्त्रियांनी वापरणे चांगले. ह्या रत्नाच्या वापराने चया-पचाय क्रिया सुधारते तर यकृताला बल प्राप्त होऊन शरीरात साठलेले अनावश्यक विषद्रव्य बाहेर टाकण्यास मदत करते, ह्याच कारणाने स्थूल व्यक्तींना वजन कमी करण्यास मदतगार ठरते. तसेच हे रत्न जल तत्वाचे असल्याने शरीरातील पाण्याचा समतोल राखण्यास उपयोगी ठरते
 डॉ.अभय अगस्ते 

बुधवार, १८ जुलै, २०१२

गुरुपुष्यामृत योग
उद्या दि.19 / 07/2012 रोजी गुरुपुष्यामृत योग आहे. ज्याच्या नावातच अमृत आहे असा हा शुभ योग. परंतु उद्या येनाऱ्या या योगाचे महत्व आणखीनच वाढलेले आहे।
         ज्योतिष शास्त्र दृष्टीने पुष्य नक्षत्रास नक्षत्राचा राजा असे म्हणतात, प्र्त्तेकाच्या कर्माचे माप न्याय बुद्धीने त्यांच्या पदरात टाकणाऱ्या शनी महाराजांचे हे नक्षत्र आहे. सागर मंथनाच्या वेळेस ह्याच नक्षत्रावर विष्णुस लक्ष्मी ची प्राप्ती झाली होती ह्या कारणाने अर्थार्जनासाठी ह्या नक्षत्रास महत्व आहे. विवाह सोडून सर्व प्रकारच्या शुभ कार्यासाठी हे नक्षत्र शुभ आहे, ह्या नक्षत्रावर सुरु केलेला व्यवसाय हा भरभराटीस येतो, व्यवसायामध्ये स्थिरता प्राप्त होते.
         ज्या वेळेस चंद्र त्याच्या स्वराशीत म्हणजेच कर्क राशीत पुष्य नक्षत्रात असतो त्या दिवशी जर गुरवार आला तर गुरुपुष्यामृत हा योग होतो, गुरु ग्रहाचा गुरुवार व शनीचे पुष्य नक्षत्र याच्या एकत्र येण्याने पुष्य नक्षत्राचे गुणधर्म अनेक पटीने वाढतात.
         आयुर्वेदाच्या दृष्टीने सुद्धा ह्या योगास महत्व आहे, ह्या दिवशी बारा वर्षा खालील मुलांना सुवर्णप्रश दिल्यास रोग प्रतिकार क्षमता वाढून मुले सुदृढ होतात.
          दि. 19/07/2012 रोजी सकाळी 10.30 ला चंद्र पुष्य नक्षत्रात प्रवेश करतो त्यामुळे सकाळी 10.30 पासून दुसऱ्या दिवशी सुर्योदयापर्यंत गुरुपुष्यामृत योग होत आहे. तसेच संद्याकाळी 07.30 ला सूर्य सुद्धा पुष्य नक्षत्रात प्रवेश करत असल्याने ह्या योगाचे महत्व आणखीनच वाढले आहे.
          गुरुपुष्यामृत योगावर नवीन व्यवसाय, गुंतवणूक, वस्तू खरेदी तसेच सर्व प्रकारचे खरेदी व्यवहार करावेत. ह्या योगावर सुवर्ण खरेदी करणे शुभ असते. कारण ह्या योगावर खरेदी केलेले कायम स्वरूपी जवळ राहते असे मानले जाते 


पुढील गुरुपुष्यामृत योग - 16 /08/2012 रोजी सूर्योदयापासून संद्याकाळी 07.00 पर्यंत .     
        

शुक्रवार, ९ मार्च, २०१२

Vastushastra va Vidnyan

           'वास्तुशास्त्र ' हा शब्द उच्चारल्या बरोबर अनेक प्रकारचे मत प्रवाह आपल्या समोर येतात, या मध्ये कोणी या शास्त्राचे अंधपने समर्थन करतात तर कोणी याला शुद्ध फसवणूक मानून जीवतोडून विरोध करतात. या दोन्ही भूमिका ह्या टोकाच्याच, वास्तविक पाहता एक दोन नियमांची पूर्तता होणे किवा न होणे म्हणजे कोणतेही शास्त्र होत नाही समर्थन करणार्यांना तरी पूर्णपणे माहिती असते असे नाही, एखादा दुसरा अनुभव काय तो पाठीशी असतो तर दुसरीकडे जुजबी माहितीच्या आधारे स्वतःला विज्ञाननिष्ट म्हणून घेण्याच्या नादात निव्वळ विरोधाला विरोध होताना दिसतो. तसे पाहता कोणतेही शास्त्र हे शास्त्र म्हणून स्वीकारताना त्या शास्त्रातील प्रत्तेक नियमांना विविध कसोटीवर तपासून पहिले पाहिजे. ज्या प्रमाणे प्रत्तेक शास्त्रातील नियम हे स्थळ, काळ, वेळ सापेक्ष असतात आणि म्हणूनच त्या नियमांना अपवाद हि असण्याची शक्यता असते, त्याच प्रमाणे वास्तुसास्त्राचा तर्कशुद्ध विचार होणे आवश्यक आहे.
               निसर्गाच्या प्रत्तेक अंगाचा विचार करून बनवलेले शास्त्र असे माझे वास्तूशास्त्रा बद्दल  मत आहे, निसर्ग चक्राशी संमाधित पंचमहाभूते व अष्ट दिशा ह्यांची सांगड घालून तयार झालेले शास्त्र म्हणजे वास्तुशास्त्र असे याचे वर्णन केले जाते, ह्या शास्त्राला पाच हजार वर्षाची परंपरा आहे, अनेक महान ऋषी मुनींनी परिश्रम घेऊन मानव कल्याणा साठी ह्या शास्त्राची निर्मिती केली आहे एवढ्या वर्षांची परंपरा असलेले शास्त्र पूर्णपणे चुकीचे कसे असेल? परंतु एकीकडे हाही विचार येतो हे जुने झालेले शास्त्र सध्याच्या परिस्थितीत कितपत उपयोगी आहे? ज्या वेळी या शास्त्राची निर्मिती झाली त्या वेळेची भोगोलिक परिस्थिती हि वेगळी होती, नदी किनारी गाव वसत असे, दळण वळणाची फारशी साधने नव्हती, मुबलक प्रमाणात जमीन उपलब्ध होती त्या मुळे कोणती योग्य व कोणती ताज्य अशा प्रकरे निवडीसाठी अनेक पर्यायांचा विचार करता येत असे. सध्या जिथे जमीनच मिळणे दुर्मिळ झाले आहे तेथे चौकोनी पाहेजे, वेडी वाकडी नको, अमुक ठिकाणीच उतार पाहिजे अन्य दिशेला नको वैगरे बाबी विचारात घेणे शक्य होत नाही, मिळेल ती जमीन सुविधेच्या दृष्टीने किती सोयीची आहे याचाच विचार केला जातो अशा परिस्थितीत वास्तुशास्त्र उपयोगी पडते का ? कीवा जागेचा कमतरते मुळे अनेक माजली इमारती बांधल्या जाऊ लागल्या त्या मध्ये संपूर्ण बधाकामाचा एखादा कोपरा म्हणजे आपला flat असतो, अशा वस्तूस वास्तूशास्त्र उपयोगाचे आहे का? या सर्व प्रश्नाची उत्तरे मिळवण्या साठी वास्तुशास्त्राची परिभाषा माहित असणे आवश्यक आहे, वास्तुशास्त्रातील एक एक नियम घेऊन त्या काळातील परिस्थिती व सद्य स्थिती यातील सर्व बाबी वैज्ञानिक  कसोटीवर तपासून, आपणास योग्य तो न्याय निवडा करता यावा म्हणून वास्तुशास्त्राचा वैदिक, योगिक, अध्यात्मिक, व वैज्ञानिक असा तौलनिक अभ्यास "वास्तुशास्त्र व विज्ञान" या लेखमाले द्वारे आपणा समोर मांडत आहे 
 ज्योतिष-वास्तू तज्ञ 
डॉ. अभय अगस्ते